जवळा शाखेचे स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर निघोज | नगर सह्याद्री चेअरमन वसंत कवाद व त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली न...
जवळा शाखेचे स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर
निघोज | नगर सह्याद्रीचेअरमन वसंत कवाद व त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असून सर्वसामान्य जनतेला पाठबळ देण्याचे काम संस्था करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाबासाहेब कवाद यांची विचारप्रणाली संस्थेला प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.
निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा जवळा येथील शाखेच्या नवीन स्वमालकीच्या जागेत स्थलांतराचे उद्घाटन आ. लंके यांच्या हस्ते झाले. सहाय्यक निबंधक गणेश औटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सुदाम पवार, किसन रासकर, अण्णासाहेब बढे, सोमनाथ वरखडे, संभाजी देविकर, सुखदेव तिखोळे, देवराम बोर्हाडे, नामदेव थोरात, चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, दामु लंके, भिवा रसाळ, पंढरीनाथ साळवे, सिदू कर्हे, शांताराम कळसकर, सुनिल मेसे, लताबाई कवाद, वैशाली कवाद, सुनिल वराळ, वसंत ढवण, मोहन आढाव, डॉ. खोडदे, प्रभाकर पठारे, बाळासाहेब मदगे, रामराव सालके, माणिकराव सालके, डॉ. पठारे, मोहन गोपाळे, कचरदास कारखिले, अशोक मेसे, दिगंबर लाळगे, गणेश कवाद, गणेश लामखडे, शंकर लामखडे, संतोष रसाळ, शांताराम लाळगे, विश्वास शेटे, दत्तात्रय लंके, शांताराम सुरकुंडे, सुनिल तांबे आदी उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले, पतसंस्थेचे कामकाज हे महाराष्ट्रात आदर्शवत आहे. पतसंस्थेने सभासद, खातेदार, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केला असून सभासदांना कर्ज रुपाने आर्थिक गरज भागविण्याची संचालक मंडळ कायम प्रयत्न करीत असते. अध्यक्ष वसंत कवाद हे अभ्यासू व्यक्तीमत्व असल्याने संस्थेचे राज्यभरात नाव झालेले दिसत आहे. संस्थेला नुकताच राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा दिपस्तंभ पुरस्कार मिळाला हे उत्तम उदाहरण आहे.
COMMENTS