वारणवाडी, कामटवाडी, हांडेवाडा येथे विकास कामांचा शुभारंभ पारनेर | नगर सह्याद्री अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकी जर तुम्हाला उमेदवार देता आला न...
वारणवाडी, कामटवाडी, हांडेवाडा येथे विकास कामांचा शुभारंभ
पारनेर | नगर सह्याद्री
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकी जर तुम्हाला उमेदवार देता आला नाही तर कशासाठी नाटक केले. धनुष्यबाण आम्हालाच पाहिजे? शिवसेना आम्हालाच पाहिजे? नाहीतर गोठवलं पाहिजे? पण जनता तुम्हाला माफ करणार नाही, दुसर्याचं वाटोळ केले. तुमचेही झाल्याशिवाय राहणार नाही आता आमच्या हातात मशाल आहे तुम्हाला कात्रजचा घाट दाखवणार, तुम्हाला इतिहास माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले ते आणि त्या इतिहासाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. राजकारण करताना समाजाचे प्रबोधनही केले पाहिजे. समाजाला योग्य दिशा दाखवणे गरजेचे असल्याचे मत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी वारणवाडी, कामटवाडी, हांडेवाडा येथे १४६.५० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, उपतालुका प्रमुख सुनिता मुळे, कैलास न-हे, अक्षय गोरडे, अमोल रोकडे, वारणवाडी सरपंच संतोष मोरे, पोखरी सरपंच सतीश पवार, देसवडे सरपंच पोपट दरेकर, माजी चेअरमन भाऊसाहेब टेकुडे, अण्णा पवार, ग्रामपंचायत सदस्य विकास रोकडे, प्रकाश घाडगे, भाऊसाहेब आहेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्राम. सदस्य संजय काशीद, साहेबराव रोकडे, बबन काशीद, बाळू कोकाटे, बंडू कोकाटे, बाळासाहेब काशीद, संदीप काशीद, पंढरी कोकाटे, भाऊसाहेब बेलकर, सुरेश बेलकर, साहेबराव काशीद, रमेश कारंडे, अशोक पिंगळे, अर्जुन पिंगळे, अशोक डोमाळे, हिरा कारंडे, धोंडीबा डोमाळे, पांडुरंग कारंडे, तुकाराम कारंडे, सतीश पिंगळे, मथु पिंगळे, धोंडीभाऊ काळे, अनिल गुंजाळ, रामदास मोरे, ग्रामसेवक वाळुंज, कामाचे ठेकेदार बबन वाळुंज, संचित वाळुंज, जयवंत वाळुंज, नरेंद्र पोळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. यावेळी औटी म्हणाले, मी आमदार झालो तेव्हा माझ्यासमोर त्रिसूत्री होती शेतीला वीज, उत्तम रस्ते आणि शेतीला पाणी, विकास ही न थांबणारी प्रक्रिया आहे. ती सतत चालणार. खर्या अर्थाने सरपंचाला जे कळाले की हे काम कोणी केले. त्यासाठी कोणी अधिकारी पाठवले आपल्याकडे त्यांनाच भूमिपूजनाला बोलावले पाहिजे. दाते सरांच्या आशीर्वादाने हे काम झाले याचे सर्व श्रेय सरपंच संतोष मोरे यांना आहे. काळजी करू नका रणांगण सोडून पाळणारा मी माणूस नाही. वयाची २७ व्या वर्षी विधानसभा लढवणारा मी आहे. आंदोलनातून घडलो आहे. भारतीय शेतकरी पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख ५५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेत, त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आज तालुयात प्रचंड पाऊस पडतोय, शेतकर्याचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे कोणी करायचे यासाठी लोकप्रतिनिधी असतो. सरकारने यासाठी कायदे केले आहेत पण ते वाचणार कोण? सध्या कोण किती वाजता झोपतो व कोण किती काम करतो याची स्पर्धा चालू आहे. मी काय सभागृह पाहिले गोपीनाथराव मुंढे आमच्या बाजूला बसायचे, डॉ. पतंगराव कदम समोर बसायचे, मुख्यमंत्री विलासराव देशमुख राजाच! राजबिंडा माणूस! निर्णय घेताना महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून घ्यायचे. आता काय चालले याचा विचार तुम्ही करा. जर समाज चुकीच्या दिशेने जात असेल तर त्यांना जागेवर आणण्यासाठी राजकारण करायचे असते. ही आपली जबाबदारी आहे. यावेळी प्रियंका खिलारी, भाऊसाहेब टेकुडे, अक्षय ढोकळे, अमोल रोकडे, सुनिता मुळे, संतोष गाढवे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता आहेर यांनी केले. तर आभार उपसरपंच जानकू दुधवडे यांनी मानले.
COMMENTS