शेतीमालाचे मोठे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुपा | नगर सह्याद्री सोमवारी पारनेर तालुयाला पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. ...
शेतीमालाचे मोठे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
सुपा | नगर सह्याद्री
सोमवारी पारनेर तालुयाला पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे तर आगामी रबी हंगामाच्या दुष्टीने शेतीची कामेही खोळंबली आहेत.
चालु वर्षी वरुण राजा जास्तच उदार झाला असुन सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी अजुन जोरदार पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस परतीच्या प्रवासाला लागत असतो परंतु चालू वर्षी अजुनही अनेक दिवस पाऊस पडणार आहे असे हवामान तज्ञ सांगत आहेत. यामुळे रब्बी हंगामातील ज्वारीसह इतर पिकांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर काही शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
गेल्या काही दिवसापासून पारनेर तालुयात सतत पाऊस पडत आसल्याने शेतीची कामे थांबली आहेत. तर जी शेतात उभी पिके आहेत. ती पाण्यामुळे सडू लागली आहेत. यात सर्वाधीक नुकसान भाजीपाला पिकांचे होत आहे. वेळेवर काढणी होत नसल्याने ही भाजीपाला खराब होत आहे. यामुळे बाजारात ग्राहकांना महाग भाजीपाला घ्यावा लागत आहे. तर शेतकर्यांना हाता तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत मातीमोल होताना दिसत आहे.
सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचेही मोठे नुकसान होत आहे. बाजारभाव नसल्यामुळे गेल्या सहा ते आठ माहिन्यापासुन शेतकर्यांनी कांदा ऐरणीत जपुन ठेवला आहे. जून महिन्यानंतर कांद्याला दरवर्षी बाजारभाव वाढवून मिळतो. यावर्षी मात्र आषाढ श्रावण नंतर भाद्रपद महिना संपत आला तरी कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असुन त्यात गेल्या अनेक दिवसापासुन सतत पडत असलेल्या पावसामुळे कांदा ऐरणीतच जागच्याजागी दमट वातावरणामुळे सडत आहे. दसरा दिपावलीला नवीन लाल कांदा बाजारात विक्रीला ऐण्याची वेळ आली तरी देखील बाजारभाव नसल्याने अनेक शेतकर्यांकडे मोठ्या प्रमाणात गावरान जुना कांदा पडून आहे. व या रोजच्या पावसाने झाकपाक करुन बळीराजा पार मेटाकुटीला आला आहे.
सोमवार दि.१७ रोजी रात्री परीसरात वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रोजच्या पावसाने जमीनी ऊपळू लागल्या असुन पाऊस थांबन्याचे नावच घेत नाही. त्यामुळे शेती नापिक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अगोदरच मुबलक पाऊस आसताना सोमवारी तालुयात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. तर शेतात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. चालू वर्षी शेतात कोणतेही पिक साधत नसल्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.
COMMENTS