आमदार नीलेश लंके / ढोकी जलजीवन नळपाणी योजनेचे भूमिपूजन पारनेर | नगर सह्याद्री विकास कामे करायच्या नावाने पत्ता नाही. फक्त श्रेय लाटण्यासाठी...
आमदार नीलेश लंके / ढोकी जलजीवन नळपाणी योजनेचे भूमिपूजन
पारनेर | नगर सह्याद्री
विकास कामे करायच्या नावाने पत्ता नाही. फक्त श्रेय लाटण्यासाठी मात्र जनतेची दिशाभूल करायची. त्यामुळे सध्या तरी विरोधक श्रेयाच्या धडपडीत बेताल वक्तव्य करू लागले आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांवर केली आहे. तर दुसरीकडे आमदार लंके बोलतोय असे मी कधीही सांगत नाही, कारण मतदारसंघातील जनता हीच आमदार आहे. मी त्यांचा सेवक आहे. त्यामुळे की केवळ नीलेश लंके बोलतोय असेच नेहमी सांगतो, कारण नीलेश लंके हे नावच पुरेस असल्याचे सांगत आपली बांधिलकी केवळ जनतेशीच असल्याचे त्यांनी सांगितले.
ढोकी येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १ कोटी ९९ लाख ७६ हजार रूपये नळ पाणी योजनेचे भुमिपुजन आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळीते उपस्थितांशी हितगुज करीत होते. यावेळी अर्बन बँकेचे चेअरमन अशोक कटारिया, सरपंच चंद्रभागा बापू मोरे, उपसरपंच बाबासाहेब धरम, बाजीराव मोरे, भास्कर खटके, संतोष धरम, कलीम पठाण, दिलीप मोरे, किरण मोरे, दादाभाऊ गायकवाड, बाळासाहेब नरे, अप्पा नहारे, बापू मोरे, बाजीराव मोरे, दादाभाऊ गायकवाड, किरण नर्हे, अशोक नर्हे, जगन्नाथ जेजुरकर, निवृत्ती भुसारी, मेहबूब पठाण, मारुती खटके यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मतदारसंघातील विविध गावांच्या योजना मंजुरीसाठी गेल्या वर्षीपासून आपण पाठपुरावा करीत होतो. प्रत्यक्षात योजनांना मंजुरी मिळून प्रशासकिय मान्यताही मिळाली. त्यानंतर विरोधक आपल्यावर टीकेची झोड उठवून या योजना आम्हीच मंजुर केल्याचा डांगोरा पिटू लागले आहेत. योजनांना कोणी मंजुरी आणली, कोणत्या सरकारच्या काळात हे सर्व झाले याची जाणीव त्या त्या गावांतील नागरिकांना आहे. परंतू श्रेयाच्या धडपडीत विरोधकांकडून बेताल वक्तव्ये येत आहेत. मी अथवा माझ्या कार्यकर्त्यांनी विरोधकांनी कधीही टिका केली नाही. त्यांनी केल्यानंतर मात्र त्यास उत्तर देऊन जनतेसमोर वस्तूस्थिती मांडणे हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.लंके म्हणाले, माझ्या सोबत एक दिवस फिरून पहा, मग ठरवा नीलेश लंकेवर टीका करायची का? राजकारण करायचे का? भले भले थकून जातील. कोरोना काळात मी व माझ्या सहकार्यांनी काम केले. देश विदेशात त्याचे कौतुक झाले. त्याचा गोळा विरोधकांच्या पोटात येतो आहे. मी प्रस्तापितांच्या विरोधात लढून ६० हजारांच्या विक्रमी मतांनी विजयी झालो आहे. पुढची निवडणूक कमीत कमी एक लाखांच्या मताधिक्क्याने जिंकून दाखवेल असे आव्हान त्यांनी दिले.
मी फकीर माणूस..
मी आजही फकीर माणूस आहे. माझा बाप आमदार, खासदार नव्हता. मी उघडयावर राहतो. तुम्ही काचेच्या घरात राहता याचे भान ठेवा. तुम्ही माझ्या किंवा आमच्या प्रतिष्ठाणच्या कितीही चौकशा करा. त्यातून काही सापडणार नाही. कारण आम्ही हे जे काही करतोय ते स्वतःच्या संसारासाठी नाही तर गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी करत असल्याचे सांगत आमदार लंके यांनी विरोधकांना फटकारले.
COMMENTS