शरद झावरे | नगर सह्याद्री पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची टाकळी ढोकेश्वर व निघोज येथे असलेल्या जमिनीची १९९९ मध्ये प्रशासकाने बाजार मूल्य ...
शरद झावरे | नगर सह्याद्री
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची टाकळी ढोकेश्वर व निघोज येथे असलेल्या जमिनीची १९९९ मध्ये प्रशासकाने बाजार मूल्य जास्त असतानाही कमी दरात विक्री केलेली आहे. यासंबंधीची तक्रार सहकार व पणन विभाग राज्याचे मुख्य सचिव व कृषी पणन महासंघटक संचालक, पुणे यांच्याकडे उषा नामदेव खोसे व वैशाली पोपट औटी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी सभापती प्रशांत गायकवाड यांच्यासह इतर १९ जणांना लेखी नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. तसचे १७ ऑटोबरला खुलाशासह हजर राहण्याचे नोटीसमध्ये नमुद केले आहे.
५ नोव्हेंबर १९९६ रोजी जिल्हा सहाय्यक निबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर यांच्यावर प्रशासक म्हणून सबाजी महादू गायकवाड, रामदास खंडू खोसे, बापू शंकर साळवे, यशवंत संपत देशमुख व विजय बाबुराव डोळ यांची नियुक्ती केली होती. प्रशासक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतानाही प्रशासक मंडळाने ११ सप्टेंबर १९९९ ला बाजार समितीच्या मालकीच्या टाकळी ढोकेश्वर व निघोज येथील जमिनी विकून आलेल्या रकमेतून सुपा येथे जमिनी खरेदी करण्याचा ठराव मंजूर केला. हे ठराव सहकार व पणन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. जमिनी विकण्यासाठी अटी व शर्ती टाकून प्रस्ताव मंजूर केले. परंतु प्रशासक मंडळानी आपले हित साधण्यासाठी टाकळी ढोकेश्वर व निघोज येथील जमिनी अल्प दरात विकल्या असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासक मंडळाने निघोज येथील बाजार समितीच्या मालकीचे सर्वे क्रमांक ३४१ व ३४२ मधील दोन हेटर ४७ आर जमिनीचे बाजार मूल्य आठ लाख ८० हजार असताना सबाजी गायकवाड, रामदास खोसे आणि बापू साबळे यांनी आपल्या सहीनिशी जमीन खरेदी खतावर सावळेराम कोंडाजी यांना केवळ दोन लाख २२ हजार ३०० रुपयांना विकल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे टाकळी ढोकेश्वर ढोकेश्वर येथील सर्वे क्रमांक ८४६ /१ मधील एक हेटर जमिनीचे बाजार मूल्य १५ लाख रुपये असताना ती जमीन केवळ १ लाख ३० हजार रुपयांना मुरलीधर विश्वनाथ लाळगे यांना विक्री करण्यात आली. दुय्यम निबंधक कार्यालयात विक्री घेणारा हा मुद्रांक शुल्क भरत असतो. असे असतानाही या दोन्ही खरेदी खताचे मुद्रांक शुल्क बाजार समितीने भरले आहे. त्यामुळे बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या बेकायदेशीर जमीन विक्री प्रकरणी मोठा गैरव्यवहार व अनियमितता लक्षात घेऊन जिल्हा उपनिबंधक अहमदनगर यांनी ८ जानेवारी २००१ रोजी विशेष अहवाल व १९ फेब्रुवारी २००० रोजीचा विशेष लेखापरीक्षण अहवाल विचारात घेऊन २२ मे २००१ रोजी वरील खरेदी खत करून दिलेली मंडळी व तत्कालीन सचिव यांच्याकडून २१ लाख ९८ हजार ९२० रुपये २२ मार्च १९९९ पासून दर साल दर शेकडा १२ टक्के दराने वसुली दिनांकासह व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले आहे. परंतु आजतागायत यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. या जमिनीसंदर्भात पारनेर बाजार समितीचे तत्कालीन सचिव यांनी नगर येथील दिवाणी न्यायालयात विशेष दावा जाहीर प्रकरण ताबा आणि मनाई हुकमाची प्रार्थना करून दाखल केला. बाजार समितीच्या जमीनी बेकायदेशी पद्धतीने बाजार समिती संचालक किंवा संचालकांच्या नातेवाईक असलेल्या लोकांनीच अल्प दरात खरेदी करून पुन्हा मोठ्या रकमांनी विकून बाजार समितीचे रकमेचा व जमिनीचा मोठा अपहार केल्याची तक्रार या अर्जामध्ये केली आहे.
या संदर्भात सन २०१४ मध्ये न्यायालयीन खटल्यामध्ये तडजोड दाखवण्यात आली असून यामध्ये बाजार समितीचे मोठी आर्थिक नुकसान झाले आहे. या जमिनीसंदर्भात कोणती वसुली अथवा कार्यवाही आजतागायत झालेली नाही. त्यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान करणार्या तत्कालीन प्रशासक मंडळ, सभापती, संचालक मंडळ व सर्व सचिव यांनी न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे दरखास्त चालवण्यात कसूर करून यासंदर्भात बेकायदेशीर व आयोग्य ठरावाला पाठिंबा देऊन किंवा त्यांचा विरोध न करून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सर्वच आर्थिक लाभ करून घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विरोधात कायदेशीर कडक कारवाई करून दोषींकडून नुकसानाची रक्कम सह्याद वसूल करावी व शेतकर्यांचे केलेले व होत असलेली नुकसान भरपाई करून त्यांना न्याय द्यावा, अशी विनंती तक्रार अर्जात केली आहे. या पत्राची दखल घेत सहायक निबंधक गणेश औटी यांनी चौकशी सुरू केली असून संचालकांचे धाबे दणाणले आहेत.
टाकळी ढोकेश्वर, निघोज येथील जमीन विक्री प्रकरण
टाकळी ढोकेश्वरसह निघोज येथील तीन हेटर ४७ आर बेकायदेशीर जमिन विक्री प्रकरणी पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी म्हणणे मांडण्यासाठी सभापती प्रशांत गायकवाड, उपसभापती विलास झावरे, बाजार समिती संचालक अरुण ठाणगे, गंगाराम बेलकर, अण्णासाहेब बढे, काशिनाथ दाते, खंडू भाईक, मीराबाई वरखडे, संगीता कावरे, विजय पवार, राहुल जाधव, हर्षल भंडारी, शिवाजी बेलकर, युवराज पाटील, सावकार बुचुडे, राजश्री शिंदे, अशोक कटारिया, सोपान अर्जुन कावरे व तत्कालीन सचिव सुभाष किसन कावरे या १९ जणांना ३ ऑटोबरला नोटीसा बजावल्या आहेत. १७ ऑटोबरला सकाळी दहा वाजता चौकशीसाठी समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा व सबळ पुरावा सादर करण्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संचालक मंडळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
COMMENTS