विश्वनाथ कोरडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पारनेर | नगर सह्याद्री भारतीय जनताचे प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे यांची काम कर...
विश्वनाथ कोरडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पारनेर | नगर सह्याद्री
भारतीय जनताचे प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे यांची काम करण्याची हातोटी वेगळी असून संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावे असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
जवळे येथे भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या संपर्क कार्यालय तसेच आपले सरकार सेवा केंद्राचे उदघाटन खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना मोफत ई - श्रम कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांचे निराकारण डॉ. विखे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्षाच्या वाढीसाठी विश्वनाथ कोरडे हे परीश्रम घेत असून त्यांच्या संपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन देशाला विकास पथावर ते घेऊन जात आहेत. त्यामुळेच त्यांना सर्व स्तरामधून मोठा पाठींबा मिळत आहे. पारनेर तालुयातील जनतेनेही भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन डॉ. विखे यांनी केले. यावेळी विश्वनाथ कोरडे यांनी कार्यालय सुरू करण्यामागे सामान्य नागरिकांच्या समस्या दुर करणे हाच हेतू असल्याचे सांगितले. या कार्यालयात येणार्या प्रत्येक नागरिकास न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या संघटन बांधणीसाठी आपण नेहमीच कार्यरत असून आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस राबविण्यात येत असलेल्या योजना घरोघर पोहचविण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे. भारतीय जनता पार्टी तालुयात पहिल्या क्रमांचा पक्ष करणे हे आपले ध्येय असल्याचे कोरडे यांनी सांगितले.यावेळी विश्वनाथ कोरडे यांच्यासह सुजित झावरे, वसंतराव चेडे, सुभाष दुधाडे, विकास रोहोकले, राहुल शिंदे, शिवाजी सालके, सागर मैड, कृष्णाजी बडवे, नवनाथ सालके, तहसिलदार शिवकुमार आवळकंठे, बाबाजी येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS