सर्वसामान्यांच्या एसटीची 10 टक्के भाडेवाढही आजपासून औरंगाबाद / नगर सह्याद्री - ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ केली...
सर्वसामान्यांच्या एसटीची 10 टक्के भाडेवाढही आजपासून
औरंगाबाद / नगर सह्याद्री -
ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ केली. त्याची अंमलबजावणी २० ऑक्टाेबरच्या मध्यरात्रीपासून हाेईल. दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्स बसला अडीच ते तीनपट भाडे आकारले जात आहे. आता औरंगाबादहून नागपूरला जाण्यासाठी एक हजारऐवजी २४०० ते ४००० रुपये माेजावे लागत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अहमदाबाद आदी शहरांत जाण्यासाठी आगाऊ बुकिंग करावी लागत आहे. आरटीओंच्या नियम व अटी, प्रवाशांना तक्रार करण्यासाठी पोर्टल नंबर जाहीर करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातून दिवाळीला बाहेरगावी जाणाऱ्या लाेकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ६० टक्क्यांवर बुकिंग आधीच झालेले आहे. ऐन वेळेवर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण इतर वेळेस पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. तेव्हा झालेला तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ केली जाते, असे ट्रॅव्हल्स कर्मचाऱ्यांनी सांगितले. रेड अॅपवर प्रवाशांना ऑनलाइन बुकिंग करता येते. मात्र, नंतर तिकीट रद्द करून पैसे परत घेता येत नाही. तसेच हंगामी भाडेवाढीचा भुर्दंड ऐनवेळी सोसावा लागतो. दिव्य मराठी प्रतिनिधीने शहानूरमियाँ दर्गा येथील तीन खासगी बस तिकीट बुकिंग काउंटरवर चाैकशी केली, तेव्हा भरमसाट तिकीट आकारण्यात येत असल्याचे समाेर आले.
आरटीओकडून दीडपट भाडेवाढीला मान्यता
खासगी बसला एरवी एसटीपेक्षा कमी भाडे घेतलेे जाते. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी दिवाळीत दीडपट भाडेवाढीला आरटीओची मान्यता मिळाली आहे, असे बस ऑनर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी सांगितले. तर प्रत्यक्षात दुप्पट, तिप्पट भाडे का आकारले जाते? २३ ऑक्टोबरला मला नागपूरला जाण्यासाठी एसी बसमध्ये किती भाडे लागेल, अशी तीन ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी २४०० ते ४००० रुपयांपर्यंत भाडे सांगितले.
COMMENTS