मुंबई | नगर सह्याद्री - शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मशाल या निवडणूक चिन्हानंतर आता एकनाथ शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावरही आक्षेप घेण्यात ...
मुंबई | नगर सह्याद्री -
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मशाल या निवडणूक चिन्हानंतर आता एकनाथ शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावरही आक्षेप घेण्यात आला आहे.
ढाल-तलवार चिन्हावर आक्षेप शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. ढाल-तलवार हे खालसा समाजाचं प्रतीक असल्यानं या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह प्रदान केलं.
COMMENTS