नगरकरांचा बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री केडगाव भूषण नगर येथील सुदर्शन रियालिटीच्या आयसीटी व्यावसायिक व गृप्रकल्पामुळ...
नगरकरांचा बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्री
केडगाव भूषण नगर येथील सुदर्शन रियालिटीच्या आयसीटी व्यावसायिक व गृप्रकल्पामुळे नगर शहरासह जिल्ह्याचेच स्वरूप बदलेल. आयसिटी प्रकल्पातील नागरीकांना मोठ्या शहरांमधील गृहप्रकल्पांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचे संचालक आनंद शहा व तन्मय शहा यांनी व्यावसायिकता सांभाळत लोकांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचे महत्त्वाचे काम केले असल्याचे गौरवोद्गार सिने अभिनेते व तत्वशील समाजसेवक मकरंद अनासपुरे यांनी केले.
नगर-पुणे रस्त्यावरील भूषणनगर चौकात रविवारी सायंकाळच्या सुमारास आयसीटी प्रकल्पामध्ये रेसिडेन्शिअल फेज -१ भूमिपूजन व बुकिंग उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी सिनेअभिनेते अनासपुरे हे बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, प्रकल्पाचे संचालक आनंद शहा, तन्मय शहा, राजेंद्र चोपडा, भारतीय महसूल सेवेतील प्रशासकीय अधिकारी जीएसटी कमिशनर शिवाजीराव डांगे, इंजिनिअर अॅण्ड कॉन्ट्रॅटर्स शशिकांत आठरे पाटील, आर्किटेचर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पादीर, उद्योजक विलास तनपुरे, अशोक भंडारी, राजेंद्र कटारिया, विवेक गांधी, बा. ठ. झावरे, बाजीराव पानमंद आदी उपस्थित होते.
बुकिंग व नाव नोंदणीसाठी अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रकल्प पाहून समाधानी झालेल्या सर्व ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे मनोगते व्यक्त केली. नगर सारख्या ठिकाणी आयसीटी सारखा प्रकल्प उभारणी सुरू असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी प्रकल्प टीमला मनापासून धन्यवाद दिले. कार्यक्रमाबरोबरच मनोरंजनाच्या रंगारंग सोहळ्यासही नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आमदार जगताप म्हणाले, की नगर शहर हे विदर्भ, खानदेश व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आर्थिक नगरींशी जोडणारे प्रवेशद्वार आहे. जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेले पुणे औरंगाबाद व नाशिक शहराच्या विस्ताराला आता मर्यादा येत आहेत. त्यामुळे आगामी काळात नगर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. आयसीटीसारख्या पायाभूत सुविधांनी परिपुर्ण अशा प्रकल्पामुळे उद्योग व व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह स्नेहालयचे डॉ. गिरीष कुलकर्णी यांनीही दृकश्राव्य साधनांद्वारे शुभेच्छा संदेश दिला. पवार म्हणाले, की नगर शहरामध्ये सुविधांअभावी पुणे मुंबईला जाणारा उच्चभ्रू वर्ग आयसीटीसाऱख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे नगर शहरातच राहील. त्यामुळे नगरच्या व्यवसाय, उद्योग व अर्थकारणाला मोठा फायदा होईल. नगरच्या वैभवला गती येईल. डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले की, सुदर्शन रियालिटीजची संकल्पना पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. अत्याधुनिक शहरी सुविधांबरोबरच रहिवाशी व व्यावसायिकांचे मानसिक स्वास्थ्य कसे चांगले राहील, महिलांमधील क्रयशक्तिचा कसा फायदा करून घेता येईल. मुलांच्या शिक्षणासाठींचे मार्गदर्शन अशा बारीकसारीक गोष्टींवरही प्रकल्पाचे संचालक आनंद शहा यांनी लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकल्पात येणार्या नागरिकांना निश्चितच याचा फायदा होईल.
प्रास्ताविकात प्रकल्पाचे संचालक आनंद शहा म्हणाले, की या प्रकल्पामध्ये सुमारे ८० प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या मनोरंजनासाठी वर्षभराचे नियोजन केले आहे. या अंतर्गत महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि इतर विविध क्षेत्रातील नामवंत नगरला येत राहतील नियोजन सुरु आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटन व्यवसायात वाढ करून त्यातून होणारे अर्थकारण यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आयसीटी प्रकल्पामुळे केडगाव परिसरातील जागांचे भाव वाढले आहेत. या प्रकल्पाला काम सुरु होण्याअगोदरच जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल अशा पध्दतीने साकारू असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. फक्त ११००० रुपये भरून या प्रकल्पाचे बुकिंग करता येईल असेही आनंद शहा यांनी सांगितले.
कामाचा दर्जा सर्वोत्तम
आमदार जगताप यांनी आपल्या भाषणात प्रकल्पाची रचना, आराखडा तसेच सध्या सुरु असलेले स्लॅप. बीम, कॉलमचे काम पाहिल्यानंतर कामाचा दर्जा सर्वोत्तम असल्याचे दिसून आले. हाच धागा पकडत अनासपुरे यांनी आपल्या शैलीत मलाही हा प्रकल्प खूप चांगला असल्याचे दिसले. आमदारांनीच तो सर्वोत्तम म्हटल्यामुळे लोकांना या ठिकाणी सहभागी होण्यास काहीच हरकत नाही असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून या दोन्ही वक्तव्यांचे स्वागत केले. आनंद शहा यांनी आयसिटी एन्टरटेन्मेंट झोनमध्ये अनासपुरे यांनी सिंडीकेट मेंबर होऊन सहभागी होण्यासाठी विनंती केली. अनासपुरे यांनीही चर्चा करून सहभागी होण्याचे मान्य केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
COMMENTS