अहमदनगर । नगर सह्याद्री नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसाने धावपळ उडाली. शहरात दुपा...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसाने धावपळ उडाली. शहरात दुपारी उशिरापर्यत काही भागात पाऊस सुरू होता.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, वातावरणात गारवा जाणवत होता. अचानकपणे कडाक्याचे ऊन देखील पडत होते. ग्रामीण भागात बाजरीची काढणी तसेच सोयाबीन आणि मुगाच्या तोडणीला पावसाने उघडीप दिल्याने वेग आला होता. अधून-मधुन कडाक्याचे उन पडत असल्याने पिकांवर पसरलेल्या रोगाला आळा बसण्यास सुरूवात झाली होती. मात्र, सोमवारी सायंकाळी आणि मंगळवारी सकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांसह सार्यांचीच धावपळ झाली. मंगळवारी सकाळच्या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. शाळेच्या वेळेतच पाऊस झाल्याने बच्चे कंपनीसह पालकांची धांदल उडाली.
COMMENTS