अहमदनगर / नगर सह्याद्री - नगर शहरासह नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, अकोला तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ज...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
नगर शहरासह नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, अकोला तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सोमवारी २९.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला होता. नगरमधील सीना नदीला ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा पूर आला आहे.
यंदा नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत १२८ टक्के पाऊस झाला आहे. तर अजूनही काही दिवस पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नगरमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीला पुन्हा पूर आला होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे सीना नदीचे पात्र मंगळवारी सकाळी दुथडी भरून वाहिले. ऑटोबर महिन्यामध्ये सीना नदीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अहमदनगर-कल्याण रोडवरील पुलावरून पाणी वाहिले, तर आयुर्वेदिक चौकातील काटवन खंडोबाकडे जाणार्या पुलापर्यंत पाणी पोहोचले होते. सकाळीही पावसाची संततधार सुरूच होती.
नगर तालुयातील पिंपळगाव माळवी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावाच्या सांडव्यातून पाणी वेगाने वाहत असल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
COMMENTS