भाजपच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन अहमदनगर | नगर सह्याद्री नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्यां...
भाजपच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्यांच्या शेतीमालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे शेती ही नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्यांना सरसकट एकरी १० हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, अभिलाष घिगे, माजी उपसभापती संतोष मस्के, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, मनोज कोकाटे, प्रशांत गहिले, राहुल पानसरे, सागर बनकर, दादा दरेकर, गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, शुभम भामरे, गणेश भालसिंग, अंकुश नवसुपे, रोहित भुजबळ, शाम कनगरे, भूषण देशमुख, अजय गार्दे, मयूर पाखरे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिरायत भागाला ६ हजार रुपये व बागायत भागाला १३ हजार रुपये अनुदान मिळत होते. मात्र भाजप - शिंदे गट सरकारच्या काळात हेटरी १३ हजार रुपये व बागायत बागासाठी २७ हजार रुपये अनुदान शेतकर्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आमची मागणी सरसकट एकरी १० हजार रुपयांची आहे. नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कपाशी, बाजरी, सोयाबीन, तूर, पालेभाज्या, फळबागा, ईत्यादी पिके अतिवृष्टीमुळे नुसकान झाले आहे. तरी शासनाने तातडीने शेतकर्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली.
COMMENTS