अहमदनगर / नगर सह्याद्री - मोक्याची जागा दिसताच वादावादीची परंपरा, हा नगरला लागलेला शाप प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळे प्रकरणातह कायम राहण्याच...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
मोक्याची जागा दिसताच वादावादीची परंपरा, हा नगरला लागलेला शाप प्रोफेसर कॉलनी चौकातील गाळे प्रकरणातह कायम राहण्याची शक्यता आहे. अद्याप कोणताच निर्णय झालेला नसताना महापालिका प्रशासन विरूद्ध गाळेधारक व त्यांचे समर्थक असा रंग येऊ लागला आहे.
सावेडी उपनगरमधील प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेच्या मालकीचे भव्य व्यापारी संकुल आहे. ते जुनाट झाले असून, सध्या तेथे बहुतांश पोटभाडेकरू आहेत. महापालिकेच्या नियमानुसार ज्यांना गाळे कराराने दिले आहेत, त्यांना पोटभाडेकरू ठेवता येत नाही. असे असतानाही गाळ्याच्या किमतीएवढे पैसे घेऊन पोटभाडेकरूच्या ताब्यात मूळ करारधारकांनी हे गाळे दिले आहेत. व्यापारी संकुल जुने झाल्याने आणि ते धोकादायक असल्याने ते पाडून तेथे नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी महापालिकेने आराखडा केलेला आहे. गाळे धारकांचा यास विरोध असून, त्यांनी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. १५ ऑटोबरला गाळेधारकांनी दाखल केलेल्या ४८ याचिकांपैकी ३५ याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. उरलेल्या आठ प्रकरणांची स्वतंत्रपणे सुनावणी सुरू आहे. महापालिकेतर्फे ऍड. प्रसन्न जोशी बाजू मांडत आहेत. अनेक गाळेधारक पोट भाडेकरू असून मूळ मालक वेगळेच असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच महापालिके सोबत केलेल्या कराराचा भंग करण्यात आला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोर्ट कमिशन नेमून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अहवाल मागवल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असा त्यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, ३५ याचिका फेटाळल्यानंतर महापालिका प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यापारी संकुलातील गाळ्यांचा पंचनामा महापालिकेने केला आहे. त्याचा अहवाल न्यायालयासमोर ठेवण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकरणात कोणतीह स्थगिती नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेला मोकळिक मिळालेली आहे. असे असले तरी आता यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. गाळे पाडण्यास काही राजकीय नेत्यांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे. ङ्गअगोदर निविदा काढा, ठेकेदार नियुक्त करा आणि नंतरच गाळे पाडाफ अशी मागणी करण्यात आली आहे. ङ्गबांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी)ङ्घ या तत्त्वावर व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. दुसरा पर्याय ङ्गफायनान्स, बिल्ट अँड (एफबीटी)फ हा आहे. या दोन्हीसाठी निविदा काढताना संबंधित जागा रिकामी असणे आवश्यक आहे. विकसित करावयाचा भूखंड रिकामा नसल्यास कोणतीही संस्था यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अगोदर निविदा काढा, ठेकेदार (विकसक) निश्चित करा आणि नंतर गाळे पाडा, या म्हणण्याला अर्थ रहात नाही.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या संदर्भात पत्रक काढले आहे. काळे यांनी सुरूवात केली असली तरी यापुढे यात महापालिकेने अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे भूखंड विकसित करताना येणार्या अडचणींची जाणीव महापालिकेला आहे. बुरूडगाव रोडवरील भाजी मार्केटची जागा विकसित करतानाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागले होते. वैयक्तिक हेतू समोर धरूनही अनेक जण यात अडकाठी आणत असतात. या सर्व बाबी पाहता हे व्यापारी संकुल विकसित करणे महापालिकेसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
COMMENTS