अहमदनगर | नगर सह्याद्री ट्रान्सपोर्टच्या ट्रकमध्ये पाठविलेल्या २५ टन मुगापैकी सात लाख रूपये किंमतीच्या १९ टन मुगाची अफरातफर करणार्या दोघांव...
अहमदनगर | नगर सह्याद्री
ट्रान्सपोर्टच्या ट्रकमध्ये पाठविलेल्या २५ टन मुगापैकी सात लाख रूपये किंमतीच्या १९ टन मुगाची अफरातफर करणार्या दोघांविरूद्ध येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश श्रीकांत चंगेडिया (वय ४३, रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
मोहम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून (दोघे रा. अजिंठा बस स्टॅडजवळ, सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंगेडिया यांचा मार्केटयार्ड येथे अन्न-धान्य खरेदी-विक्रीचा व्यावसाय आहे. त्यांनी १० सप्टेंबरला जगन्नाथ रामभाऊ कोलते यांच्या गुरूकृपा ट्रान्सपोर्ट, नागापूर चौक यांच्या ट्रक (एमएच २० इजी १८१०) मध्ये २५ टन मूग भरला होता. तो मूग इंदौर (मध्यप्रदेश) येथे पाठविण्यासाठी ट्रक चालक म्हणून महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून यांना पाठविले होते. त्यांनी ट्रक ११ सप्टेंबरला कन्नड घाटात पलटी झाल्याचे सांगून त्यातील मूग व्यवस्थित असल्याचे सांगितले. दरम्यान १८ सप्टेंबरला ट्रकमधील मूग दुसर्या ट्रकमध्ये भरून त्याचे वजन केले असता तो ६.५ टन भरला. मुगाची मोहम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून यांनी अफरातफर केल्याचा संशय चंगेडिया यांना आल्याने त्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी होऊन मोहम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरून यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
COMMENTS