अहमदनगर| नगर सह्याद्री परस्परविरोधी दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात पोलीस ठाण्यात आलेले दोन गट एकमेकांवर भिडले. पोलिसांनी मध्यस्थी ...
अहमदनगर| नगर सह्याद्री
परस्परविरोधी दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात पोलीस ठाण्यात आलेले दोन गट एकमेकांवर भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करून मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही या दोन्ही गटांनी जुमानले नाही. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत दोन्ही गटांच्या सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार रावसाहेब सानप यांनी दिलेल्या फिर्यादीत स्वप्निल अरूण म्हस्के (वय ३२), अग्रेस अरूण म्हस्के (वय ५७), संदेश अरूण म्हस्के (वय ३६), सियोन अरूण म्हस्के (वय ३९), छाया नंदकुमार म्हस्के (वय ५५) व नंदकुमार विद्याधर म्हस्के (वय ६८, सर्व रा. झोपडी कॅन्टींग, सावेडी) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती कारणातून सोमवारी छाया म्हस्के यांनी अग्रेस म्हस्के यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती. मंगळवारी अग्रेस म्हस्के यांनी नंदकुमार म्हस्के व छाया म्हस्के यांच्याविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी परस्परविरोधी अदलखपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मंगळवारी या दोन्ही तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलविले होते. दुपारी पावणे दोन वाजता दोन्ही गटात शिवीगाळ, मारहाणीची घटना घडल्याने त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS