अहमदनगर | नगर सह्याद्री एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिराच्या नवरात्र यात्रेमध्ये दोघांवर चाकू हल्ला झाल्याची घटना ५ ऑटोबरला रात्री घडली. गणेश ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिराच्या नवरात्र यात्रेमध्ये दोघांवर चाकू हल्ला झाल्याची घटना ५ ऑटोबरला रात्री घडली. गणेश अशोक दिवटे (वय २६ रा. निंबळक ता. नगर) व सागर शेळके अशी जमखींची नावे आहेत. या प्रकरणी ६ ऑटोबरला दिवटे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय ऊर्फ पप्पू पाटोळे, शुभम भाकरे, करण पाचारणे (तिघे रा. नागापूर) व अनोळखी तीन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गणेश दिवटे त्यांचे कुटुंब व मित्र सागर शेळके यांच्यासह रेणुकामाता येथील यात्रेतील रहाट पाळण्यात बसण्यासाठी गेले होते. तेथे असलेल्या पाटोळे, भाकरे, पाचारणे व इतर तिघांनी त्यांना स्त्रीयांच्या अंगावर ढकलून दिले. तेव्हा फिर्यादी त्यांना ढकलू नका असे म्हणाले. याचा त्यांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय पाटोळे याने फिर्यादीच्या मांडीवर व बरगडीजवळ चाकूने वार केले. सागर शेळके यांच्या बरगडीजवळ चाकूने वार करून त्यांना जखमी करण्यात आल्याचे फिर्यात म्हटले आहे.
COMMENTS