जिल्ह्यात आतिवृष्टी; शेतकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शेतमालाचे मोठे नुकसान /  कृषी विभागामार्फत पंचनामा करण्याचे तहसिलदारांचे आदेश अहमदनगर / सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन...



शेतमालाचे मोठे नुकसान /  कृषी विभागामार्फत पंचनामा करण्याचे तहसिलदारांचे आदेश

अहमदनगर / सुपा | नगर सह्याद्री

पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यापासुन सतत पाऊस पडत असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुयात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.

जुन महिन्यापासुन पारनेर तालुयात आज अखेर सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. पावसाने चालु वर्षाची सरासरी केव्हाच ओलांडली आहे. या सततच्या पावसाने खरिपाच्या व रब्बी पिकांचे मात्रे झाले. तसेच रब्बी हंगामही धोयात आला आहे.  भाजीपाला पिकेही सडून गेले तर फुल शेतीही कोलमडून गेली. एकंदरीतच येवढा पाऊस होऊनही शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट खते बि बीयाणे औषधे मजुरी हे सर्व करताना बळीराजा आजुनच कर्जबाजारी झाला आहे. ऑटोबर महिना अर्धा संपत आला आसताना देखील रोज जोरदार पाऊस पडत आहे. हे प्रमाण गेल्या महिना भरापासुन खुपच आसुन यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दहा दिवसापासून पारनेर तालुयात  जोरदार पर्जन्य वृष्टी होत आहे. हातातील सोयाबीन पीक कढणी वाचून तसेच वावरात पावसाच्या पाण्यात सडून चालले आहे. जनावरांना शिवारातील मका, कडवळ खाद्य आणू शकत नाही. सर्वत्र जमिनीमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. सर्व जमीनी ऊपळल्या असल्याने कुठलीच मशागत शेतकरी करूच शकत नसल्यामुळे सर्वत्र सर्व जमीनीवर गवताचा गुडघ्यापर्यंत वाढलेला थर पहावयास मिळत आहे. भाजीपाला पिके जागेवरच सडून गेली असून फुलशेतीही रोजच्या पावसाने कोलमडून पडली आहे.

सततच्या व जोरदार पावसाने जमीन नापीकी व ओल्या दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. ऐरणीतील कांदा सडून गेला तर आहे. तसेच कांद्याची ऊगवलेली रोपे सडून गेली आहेत. यावर्षी दिवाळी चांगली होईल असे वाटत असताना  पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे  शेतकरी वर्गातुन तालुयात ओला दुष्काळ जाहिर करून शेतमालाचे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. याबाबत पारनेरचे तहसिलदार आवळकंठे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,  कृषी विभागामार्फत गावोगावातील कृषी सहाय्यकाच्या मदतीने जिथे तक्रारी आल्या असतील तेथे पंचनामे करण्याचे आदेश दिले असुन नुकसानग्रस्थ शेतकर्‍यांनी कृषी साह्यकांच्या मदतीने नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून घ्यावेत असे तहसिलदारांनी सांगितले.



ओला दुष्काळ जाहीर करा - महाराष्ट्र राज्य किसान सभेची मागणी

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकर्‍यांना विना विलंब, विनाअट नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. बन्सी सातपुते यांनी दिली.

राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापुस, सोयाबीन सारखे पिक संपुर्णपणे नष्ट झालेले आहे. विमा कंपन्या पिक कापनीच्या नावाखाली तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन विमा धारक शेतकर्‍यांना लाभापासून वंचित ठेवत आहे. विमा कंपन्यांनी विमा धारक शेतकर्‍यांना शंभर टक्के विमा भरपाई द्यावी, विमा न भरणार्‍या  शेतकर्‍यांना हेटरी एक लाख रुपये शासनाने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS

Name

Accident,35,Ahmednagar,7232,Akole,20,braking,43,Breaking,5110,Business,4,corona,559,Crime,1428,e,2,economics,11,Editorial,29,education,146,Entertainment,1326,Epaper,29,Health,393,indan,8,India,1208,Jamkhed,46,Karjat,9,Kopargaon,6,loni,28,m,1,ma,1,Maharashtra,4832,manoranjan,13,Mumbai,207,Nagar,291,Newasa,65,Parner,3013,Parner Ahmednagar,54,Parner-news-sujit-zaware-sosiety-ele-1037893,2,Pathardi,19,Politics,1260,Rahata,45,Rahuri,19,SadPadsad,19,sampadkiy,99,Sangamner,153,Saripath,44,Shevgaon,11,shivvyakhyate-tapkir-news,1,Shrigonda,131,Shrirampur,9,Sport,271,sports,40,weather,32,World,123,
ltr
item
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री: जिल्ह्यात आतिवृष्टी; शेतकऱ्यांनी केली 'ही' मागणी
जिल्ह्यात आतिवृष्टी; शेतकऱ्यांनी केली 'ही' मागणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjeQkMMVL4cpXYOhi0PEpdAwK1Hs361R9dDr0DXg4y2P4bO51_vy0mf5ebCmv-RPYPxbrWQlqrllEWZtsxlcC1DIbhqi_xe-kcp-qgVeptXrGT-8kUIyccigRSGnQ3_-ODVWrMpWjbn4GQRmsU6-xLnVayA4924LxQIHEeJNZNEFHxBolrqbiKg8JJy/s16000/parner.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjeQkMMVL4cpXYOhi0PEpdAwK1Hs361R9dDr0DXg4y2P4bO51_vy0mf5ebCmv-RPYPxbrWQlqrllEWZtsxlcC1DIbhqi_xe-kcp-qgVeptXrGT-8kUIyccigRSGnQ3_-ODVWrMpWjbn4GQRmsU6-xLnVayA4924LxQIHEeJNZNEFHxBolrqbiKg8JJy/s72-c/parner.jpg
Nagar Sahyadri : नगर सह्याद्री
https://www.nagarsahyadri.com/2022/10/AHMEDNAGAR-ATIVRUSTHI-SHETKARI-.html
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/
https://www.nagarsahyadri.com/2022/10/AHMEDNAGAR-ATIVRUSTHI-SHETKARI-.html
true
3854568444215913215
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content