अहमदनगर | नगर सह्याद्री दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्याचा राग मनात धरून तरूणाला लाकडी दांडयाने मारहाण करण्यात...
अहमदनगर | नगर सह्याद्री
दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्याचा राग मनात धरून तरूणाला लाकडी दांडयाने मारहाण करण्यात आली. सोन्याबापू विष्णू जरे (वय ३७, रा. बहिरवाडी जेऊर, ता. नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल स्वर्णज्योतजवळ ही घटना घडली.
जखमी जरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून देविदास दत्तू काळे (रा. बहिरवाडी जेऊर, ता. नगर) व इतर सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षापूर्वी बहिरवाडी जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत देविदास काळे यांची भावजय पराभूत झाली होती. हा राग मनात धरून सोमवारी १७ ऑटोबरला दुपारी काळे व इतर सहा जणांनी सोन्याबापू जरे यांना नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल स्वर्णज्योत येथे गाठून लाकडी दांडयाने मारहाण केली. तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सर्व देविदास काळे याच्या चारचाकी वाहनात बसून निघून गेल्याचे जरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार थोरवे करीत आहेत.
COMMENTS