पारनेर / नगर सह्याद्री - पारनेर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ हत्याकांडातील आरोपी बबन कवाद याचा जाम...
पारनेर / नगर सह्याद्री -
पारनेर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ हत्याकांडातील आरोपी बबन कवाद याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. आरोपी कवाद याला वराळ हत्याकांडात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्याने न्यायालयाने जामीन देताना घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी आरोपी बबन कवाद याचा जामीन रद्द करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. फिर्यादी वराळ यांचे म्हणणे मान्य करत मंगळवारी न्या. कंकनवाडी यांच्या न्यायालयाने आरोपी कवादचा जामीन रद्द केला आहे.
२१ जानेवारी २०१७ रोजी निघोज (ता. पारनेर) गावचे माजी सरपंच संदीप वराळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील आरोपींना अटक झालेली आहे. हत्याकांडातील आरोपी बबन कवाद याचा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याने न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केले होते. यामुळे फिर्यादी रंगनाथ वराळ यांनी आरोपी कवादचा जामीन रद्द करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर फिर्यादी वराळ यांचे म्हणणे ग्राह्य धरत आरोपी बबन कवादचा जामीन रद्द केला आहे. फिर्यादी वराळ यांच्यावतीने अॅड. एन. बी. नरवडे यांनी तर आरोपी कवाद याच्यावतीने अॅड. चैतन्य धारूडकर यांनी काम पाहिले.
COMMENTS