सुपा | नगर सह्याद्री अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा येथे मोटारसायकलला चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील ए...
सुपा | नगर सह्याद्री
अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा येथे मोटारसायकलला चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक व्यक्ती जागीच ठार झाली तर एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, बुधवारी दुपारी शहाजापुर ता.पारनेर येथील शशिकांत गवळी व त्यांचा पुतन्या गणेश गवळी हे मोटार सायकल क्रमांक एम एच-१६ ए एस- ६०४० वरुन पुणे रोड कडून सुप्याच्या दिशेने येत आसताना पाठीमागून पुण्याकडून नगरच्या दिशेने जात आसलेल्या चारचाकी कार क्रमांक एम एच१२ केई-३०४६ ह्या गाडीने मोटारसायकल ला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती कि दोन चाकीवरील चुलते पुतने जोरात उडून पडले. यात शशिकात गवळी जागीच ठार झाले तर गणेश गवळी गंभीर जखमी झाले. जखमीला सुपा येथे खाजगी रुग्णालयात व नंतर पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
अपघाताला कारनीभुत ठरलेली चार चाकी गाडी व चालक बाबासाहेब छबु माने राहणार महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी यास सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले असुन मृतदेह उतरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना सुनिल कुटे, ओहळ हे करत आहेत.
COMMENTS